दुसर्याचा आनंद स्वतःपेक्षा जास्त जोपासु शकत असाल
तरच करा हे प्रेम,
स्वतःच्या सुख समाधानाची आहुति प्रेमरूपी हवनात करू शकत असाल,
तरच करा हे प्रेम
त्या ख़ास व्यक्तीच्या एका स्मीतहास्यासाठी वाटेल ती किम्मत मोजू शकत असाल
तरच करा हे प्रेम,
अस्मानी कळा सोसून त्या व्यक्तीला दुसरयाबरोबर बघण्याच धाडस असेल
तरच करा हे प्रेम
अपेक्षाभंग होउनही हसरा चेहरा ठेवण्याची क्षमता असेल
तरच करा हे प्रेम,
त्या व्यक्तित लाख दोष असले तरी प्रत्येक वेळी ते नजरेआड़ करू शकत असाल
तरच करा हे प्रेम
आपली दुखः पचवून त्या व्यक्तीला खुश ठेवण्याचा यत्न करण्याची ताकत असेल
तरच करा हे प्रेम
पूर्ण जग त्या व्यक्तीवर फिरल तरीही तिची साथ न सोडण्याची शक्ति असेल
तरच करा हे प्रेम
काळजावर दगड ही ठेवून त्या व्यक्तीला ती आपल्याबरोबर खुश नाही म्हणुन मोकळ करण्याच साहस असेल
तरच करा हे प्रेम
फारच बोललो... पण एक गोष्ट खरी..प्रेम हे काही ठरवून करता येत नाही,
ठरवून जर करू शकत असाल तर करून दाखवाच हे प्रेम
