असीमित असला तरी सगळ्याना आपल्यात सामावुन घेणारा,
कोणी काहीही दिले तरी निमूटपणे सहन करणारा,
पवित्र निर्माल्य असो की दिवसभराचा कचरा असो,
निश्चल मनाने स्वीकारणारा समुद्र …
अशा ह्या समुद्राचे आणि माझे फार जुने नाते आहे !!
आठवडाभराच्या त्रासदायिक आणि घायाळ करणाऱ्या गोष्टींपासून मला दिलासा देणारा हा समुद्र,
सगळ्यानसाथी असुनहि नेहमी एकटा असणारा हा समुद्र,
“गोष्टी कितीही दुखवणाऱ्या असल्या तरी आपण आपली सीमा सोडु नये” ही शिक्षा मला देणारा हा समुद्र,
अंगाची आणि मनाची लाही आपल्या शीतल अस्तीत्वाने शांत करणारा हा समुद्र,
माझ्या मनाची व्यथा बघुन माझ्याबरोबर माझ्याचसाठी अश्रु ढाळणारा समुद्र ...
अशा ह्या समुद्राचे आणि माझे फार जुने नाते आहे !!
अशा ह्या समुद्राचे आणि माझे फार दृढ़ नाते आहे !!

(English Translation)
"Ocean...bottomless and vast
Although endless, it accepts almost everyone and everything
No matter what a person gives, may it be flowers or may it be trash...it quietly tolerates and accepts it
Such an ocean and I have an old relation
Ocean.. the one who consoles & alleviates all of my week long work and pain
Ocean.. although it is there for everyone, still being utterly alone
Ocean.. teaching me "no matter how painful a thing might be we should never leave our limits"
Quenching the heat of body and mind by its mere presence
Ocean... looking at my pain n agony.. cries along with me for myself
Such an ocean and i have an old relation
such an ocean and i have a deeper and profound relation"